
तमिळ भाषा ही सुंदर भाषा असून जगभरात लोकप्रिय आहे, ही भाषा आपल्याला शिकता नाही आली अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान आपल्या मन की बात मध्ये बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कधी कधी एखादा साध प्रश्न मनाला यातना देऊन जातात. हे प्रश्न फार मोठे नसतात पण फार सामान्य असतात. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा यांनी असाच एक प्रश्न विचारला होता की आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झालात या सगळ्यात कुठलीही गोष्ट बाकी राहिली का?
या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की तमिळ ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. तमिळ ही भाषा जगभरात लोकप्रिय आहे, अनेकांनी मला तमिळ साहित्याबद्दल सांगितले. ही भाषा शिकण्याचा आपण खूप प्रयत्न केला पण ते काही जमले नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले.




























































