
येत्या 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) तब्बल 670 कंपन्या जम्मू-कश्मीरमध्ये तैनात करण्यात येत आहेत. याशिवाय ड्रोन, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा आणि श्वान पथकांच्या मदतीने संपूर्ण यात्रामार्गावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. यात्रेला अवघा महिनाभराचा कालावधी उरला असताना सुरक्षा दलांनी तयारीला वेग दिला आहे.
- जम्मूच्या भगवती नगर येथील मुख्य बेस कॅम्पमध्ये वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला.
- यात्रेदरम्यान महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच लंगर, विश्रांती केंद्रे आणि संवेदनशील भागांमध्ये श्वान पथकांच्या मदतीने नियमित तपासण्या करण्यात येतील.
- यात्रेशी संबंधित घोडेवाले, हमाल, स्वयंसेवक आणि इतर सेवा पुरवणाऱ्यांची सखोल पडताळणी सुरू असून त्यांना विशेष ओळखपत्रे दिली जात आहेत.

























































