
प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे आपल्या दारात एक छानशी कार असावी असे स्वप्न असते. परंतु बऱ्याचदा कारच्या किंमती प्रचंड असल्याने सेकंड हँड गाडी घेण्याकडे कल असतो. मात्र आज आम्ही तुम्हाला 3 लाखांहून कमी किंमतीत येणाऱ्या दोन नव्याकोऱ्या कारची माहिती देणार आहोत.
तुमचे बजेट जर जास्त नसेल तर तीन लाखांपर्यंत येणाऱ्या कारबाबत जाणून घेऊया. Datsun Redi-Go आणि Maruti Suzuki Alto या दोन कारची सुरुवातीची किंमत तीन लाखांहून कमी आहे. तसेच या कारचे इंजिन, परफॉर्मन्स आणि ट्रासमिशनही जबरदस्त असल्याने या कारची दमदार विक्री होताना दिसतेय. चला तर जाणून घेऊया या दोन कारच्या फिचर्सबाबत…
Datsun Redi-Go

– इंजिन – 799 सीसी ते 999 सीसी
– बीएचपी – 53.64 ते 67.05
– मायलेज – 20.71 ते 22.00 किमी पर लिटर
– Datsun Redi-Go ही कार 6 व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे.
– दिल्लीमध्ये याची शोरुम किंमत 2.86 लाखांपासन 4.82 लाखांपर्यंत आहे.
– या गाडीतून पाच व्यक्ती प्रवास करू शकतात.
Maruti Suzuki Alto

– इंजिन – 796 सीसी (3-सिलिंडर, 12-वाल्व, BS-6 कम्प्लायंट वाले इंजिन)
– मायलेज – 22.05 ते 31.59 किमी पर लिटर
– पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय उपलब्ध
– दिल्लीमध्ये याची शोरुम किंमत 2.99 लाखांपासून 3.68 लाखांपर्यंत आहे.
– या गाडीतून पाच लोक आरामात प्रवास करू शकतात.
(टीप – ही माहिती कारवाले (Carwale) या वेबसाईटवरून घेण्यात आली असून प्रत्येक शहरात गाड्यांच्या किंमतीत थोडाफार बदल असू शकतो)




























































