सीएच्या बँक खात्यावर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईमेल आणि फोनद्वारे बँकेत संपर्क करून सायबर ठगाने वृद्ध सीएच्या बँक खात्यावर डल्ला मारून दहा लाख रुपये काढले. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे विलेपार्ले येथे राहतात. ३१ जुलैला त्यांच्या खात्यात १२ लाख ४३ हजार रुपये शिल्लक होते.

३ ऑगस्टला त्याने नेट बँकिंगचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे खाते डिअॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले. बँकेकडून त्याने नवीन पासवर्ड मिळवून शिल्लक तपासली असता खात्यातून १० लाख रुपये लंपास झाल्याचे निदर्शनास आले.