माजी आमदार चंद्रशेखर आणि नरेंद्र घुलेंविरोधात मारहाणीचा गुन्हा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।   नगर     

माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या विरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा ज्ञानेश्वरचे सभासद ज्ञानेश्वर पाडळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. 19 ऑक्टोबर रोजी 11 वाजता ज्ञानेश्वर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ज्ञानेश्वर कारखान्याच्या नाव बदलण्याचा महत्वाचा विषय आला होता. त्या सभेला पाडळे सभासद असल्याने उपस्थित होते. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांच्यासह विलास लोखंडे,विठ्ठल परदेशी,छबु शेख,बशीर शेख व इतर पाच सहा जणांनी शिवीगाळ करून चेंबरमध्ये कोंडून मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे पुढील तपास करत आहे.