रेल्वे अभियंत्याला खंडणीसाठी धमकी; बंगरुळूच्या ठेकेदारावर मिरजेत गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता नीरज नरेंद्र बाफना यांच्याकडे दोन लाखांची खंडणी मागून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बंगळुरूच्या ठेकेदाराविरुद्ध मिरजेतील गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्ये रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता नीरज बाफना रेल्वेच्या हुबळी विभागात कार्यरत असताना बंगळुरू येथील अक्षय कन्स्ट्रक्शनचे प्रसाद राजू यांनी रेल्वेच्या कामाचे टेंडर घेतले होते. कामाच्या टेंडरसाठी त्यांनी रेल्वेकडे सुमारे 35 लाख रुपये अनामत रक्कम भरली होती.

नियमांनुसार काम करताना लागणाऱ्या साहित्याची बाजारामध्ये किंमत वाढल्याने प्रसाद राजू यास ठरलेले काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे प्रसाद राजू याने अभियंता नीरज बाफना यांच्याकडे रेल्वेकडे अनामत परत देण्याची मागणी केली. बाफना यांनी रेल्वेच्या नियमानुसार 75 टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय अनामत परत देता येत नसल्याचे सांगितले.

त्यानंतर प्रसाद राजू याने बाफना यांना मला 2 लाख रुपये द्या, नाही तर मारून टाकीन, अशी व्हॉट्स अॅपवरून धमकी दिल्याचे बाफना यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बंगळुरू येथील ठेकेदार प्रसाद राजू याच्याविरुद्ध बाफना यांनी खंडणी व धमकीची तक्रार दिली आहे.