महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतही ईडीकडून कारवाईचे सूडचक्र सुरूच आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्यावर आज ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ‘पॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात महुआ मोईत्रा यांची सुरुवातीला खासदारकी रद्द केली. त्यानंतर पेंद्र सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण दिले. सीबीआयने मोईत्रा यांच्यावर ‘फेमा’ कायद्याचे (विदेशी चलनविरोधी कायदा) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर आज ईडीने मनी लॉण्ड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे.