हिंदु विद्यार्थीनींचा रस्ता अडवुन चार मुस्लिम युवकांनी केली मारहाण; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
molestation-1

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शहरातील गवळीपुरा भागात असलेल्या गोदावरी कागलीवाल माध्यमिक शाळेच्या प्रवेशव्दारासमोर हिंदु विद्यार्थीनींचा रस्ता अडवुन मारहाण करत ओढणी ओढुन विनयभंग केल्याप्रकरणी चार मुस्लिम युवकांविरुध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंगोली शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गवळीपुरा भागात राहणारी 16 वर्षीय मुलगी कागलीवाल शाळेत बुधवारी दुपारी 12.15 वाजता जात होती. त्यावेळी याच भागात राहणार्‍या शेख शाहीद शेख अख्तर याला विद्यार्थीनीने व तिच्या मैत्रिणीने रस्ता सोडा असे सांगीतले. त्यावरून शाहीद याने पीडीत विद्यार्थीनीसह तिच्या मैत्रिणीला चापट मारून ओढणी ओढली. तसेच शेख शोएब शेख अख्तर, शेख अलीमुनीया शेख अख्तर, आसीम कलीमबेग मिर्झा (सर्व रा.गवळीपुरा हिंगोली) यांनी या विद्यार्थीनींना अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केल्याचे पोलिसांनी सांगीतले. दरम्यान, विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून चौघांविरुध्द विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमाच्या कलमानुसार हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरचे डीवायएसपी राहुल मदने यांनी पोलिस ठाण्यात येऊन विद्यार्थीनींची तक्रार ऐकली. तसेच पालकांचे म्हणने ऐकुन घेऊन गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.