दापोलीतील तेरेवायंगणी येथील गावातील शेतक-यांनी दापोली शहर बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेले ओले काजुगर दहा रूपयांना 3 असे विकले जात आहेत. असे असतानाही नवलाई म्हणून येथे भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांपेक्षा स्थानिक खवय्यांचीच काजुगर खरेदीसाठी मोठी झुंबड उडत आहे. त्यामुळे
कोकणातील खवय्ये हापूस आंब्यासारखीच ओल्या काजूगरांची प्रतिक्षा करतात. अनेकांसाठी तर यापासून तयार केलेले पदार्थ म्हणजे शाही मेजवानी असते. परंतु यंदा बदलत्या हवामानाचा या पिकाला मोठा फटका बसला आहे. मात्र त्यातूनही काही शेतकरी बागायतदारांनी मेहनतीने काजूचे पिक टिकवून ठेवले असून असे शेतकरी हे आपल्या काजू बागेत तयार झालेल्या काजू बियांचे ओले काजूगर विक्रीसाठी दापोली बाजारपेठेत आणत आहेत. नव्याची नवलाई म्हणून चढया दरानेही येथे आलेल्या पर्यटकांपेक्षाही स्थानिकच काजुगर खरेदीसाठी प्रचंड गर्दी करत आहेत त्यामुळे विक्रीसाठी आणलेल्या ओल्या काजुगरांची हातोहात विक्री होत आहे.