
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकराने बारावीच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. कोरोना संकटात मुलांवर ताण टाकणे योग्य नाही. या दरम्यान असे बोलले जात आहे की, जर परीक्षा आयोजित केल्या गेल्या तर पालकांना त्याबद्दल माहिती दिली जाईल.
विरोधी पक्ष परीक्षा रद्द करण्याबाबत सतत मागणी करत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही सोमवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात लिहिलं होत की, पालक व शिक्षक सातत्याने परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे. या साथीच्या रोगाच्या काळात ऑफलाइन परीक्षांमुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.


























































