CBSE MATHS EXAM – गणिताच्या पेपरसाठी काही महत्त्वाच्या टीप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्याचं आव्हान सगळ्या विद्यार्थ्यांसमोर असतं ज्यामुळे त्यांच्यावर ताण येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सगळ्या विषयांमध्ये गणित हा बहुतांश विद्यार्थ्यांसाठी अवघड विषय असतो. गणिताचा पेपर सोपा जावा यासाठी सतत सराव करत राहणं गरजेचं असतं. सरावामुळे गणिताचा पेपर सोपा जाऊ शकतो. महाराष्ट्रातील बायजू ट्यूशन सेंटरचे विभागीय शिक्षण प्रमुख सचिन शेट्टी यांनी गणिताचा पेपर सोपा जावा यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

उजळणी करणे

गणिताचा पेपर ( सीबीएसई बोर्डाचा) हा 21 मार्च रोजी आहे. परीक्षेसाठी दिवस कमी असल्याने विद्यार्थी चिंतेत पडणं स्वाभाविक आहे, मात्र 21 तारखेपर्यंत तुम्हाला गणिताच्या सरावाचे आणि उजळणीचे तास वाढवत न्यावे लागतील. पेपरमध्ये हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडवण्याचा सराव केला पाहिजे. अनेकदा प्रश्न विचारला जातो की गणिताचा दिवसातून किती तास अभ्यास करावा? या प्रश्नाला उत्तर द्यायचे झाल्यास किमान 2 तास गणिताचा अभ्यास केल्यास तुम्हाला पेपर सोपा जाऊ शकतो. सराव आणि उजळणी झाली असल्यास विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थी तणावाखाली न येता पेपर सोडवू शकतो.

महत्त्वाच्या प्रकरणांवर अधिक जोर द्या

गणितामध्ये एकूण 15 प्रकरणे आहेत. ही सगळी प्रकरणे समान नाहीत. सगळ्या प्रकरणांमध्ये संख्‍या प्रणाली, बीजगणित, भूमिती व त्रिकोणमिती आणि मापन यांसारख्‍या प्रकरणांना गुणांच्या बाबतीत जास्त महत्त्व आहे. म्‍हणून विद्यार्थ्‍यांनी या प्रकरणांची अधिक तयारी करण्‍यावर भर दिला पाहिजे. न समजणाऱ्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी शिक्षक किंवा मार्गदर्शकांची मदत घेतली जाऊ शकते. परीक्षेला कमी दिवस उरलेले असताना त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मोलाचे ठरू शकते.

आधीचे पेपर सोडवण्याचा सराव करा
होऊन गेलेल्या परीक्षांचे पेपर सोडवणे हे फायदेशीर ठरते. गेल्या काही वर्षातील पेपर सोडवण्याचा सराव केल्यास हमखास विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत, कोणत्या प्रकरणांतील प्रश्न जास्त विचारले जातात याची कल्पना येण्यास मदत होते. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्यास आपण केलेला अभ्यास, सराव आणि उजळणी किती फायदेशीर ठरू शकते त्याचा अंदाज येण्यास मदत होते. परीक्षेसाठी त्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पाहून त्यानुसार टिपा तयार करणंही फायदेशीर ठरतं. पाठांतर करण्याऐवजी प्रत्‍येक सूत्र व प्रमेयामागील मुलभूत तत्त्वे समजून घेतल्यास ते फायदेशीर ठरू शकतं.

उदा. पायथागोरसचा सिद्धांत: काटकोन त्रिकोणामध्‍ये कर्णाच्‍या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्‍या लांबींच्‍या वर्गांच्‍या बेरजेइतका असतो (c^2 = a^2 + b^2). हे प्रमेय ‘काटकोन त्रिकोणाच्‍या सर्व बाजू एकमेकांशी संबंधित असतात’ हे सहजपणे लक्षात ठेवता येऊ शकते.

किंवा अंतराचे सूत्र: प्रतलामधील दोन बिंदू (x1, y1 व (x2, y2) दरम्‍यानचे अंतर d = √((x2-x1)^2 + (y2-y1)^2) या सूत्राचा वापर करून गणन करता येऊ शकते. हे ‘प्रतलामधील दोन बिंदूंदरम्‍यानचे अंतर पायथागोरसच्‍या प्रमेयाचा वापर करत शोधता येऊ शकते’ यासह सहजपणे लक्षात ठेवता येऊ शकते.

पेपरचा पॅटर्न समजून घ्या

पेपरचा पॅटर्न कसा आहे हे समजून घेणं फार अवघड नसतं. जुने पेपर काढून पाहिल्यास आपल्याला त्याची कल्पना सहजपणे येऊ शकते. साधारणपणे गणिताच्या पेपरचे स्वरुप खालीलप्रमाणे असते.

  • स्‍मरण व आकलनावर आधारित (गुणांचा भार ५४ टक्‍के = ४३ गुण)
    उपयोजनावर आधारित (गुणांचा भार २४ टक्‍के = १९ गुण)
    विश्‍लेषण, मूल्‍यांकन व निर्माणावर आधारित (गुणांचा भार २२ टक्‍के = १८ गुण)

या मार्गांचा अवलंब करत विद्यार्थ्यांचा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर सोपा होऊ शकतो. ही परीक्षा आणि गणिताचा पेपर महत्त्वाचा असल्याने त्यासाठी चांगली तयारी करणं हे विद्यार्थ्यांसाठी गरजेचं असतं. योग्य ती तयारी झाली असल्यास विद्यार्थी आत्मविश्वासाने पेपर देऊ शकतात. योग्य तयारी हा यशाचा पाया आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून, परीक्षेत उत्तम कामगिरी करण्‍याचा प्रयत्‍न करा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्‍छा.’’