
जम्मू कश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात 19 जखमी झाले होते. आता हल्ल्याचे एक सीसीटीव्ही फुटेज हाती आले असून त्या आधारे दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
युरोपिय युनियनचे प्रतिनिधीमंडळ मंगळवारी कश्मीरचा दौरा करणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याद्वारे तपासाला गती देण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
#WATCH Jammu & Kashmir: Terrorist lobs grenade near a bus stand in Sopore, injuring 19 people. (28.10.19) (Source – CCTV footage) pic.twitter.com/yp46pZDGKS
— ANI (@ANI) October 29, 2019
सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करत सोमवारी दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 19 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
युरोपिय प्रतिनिधीमंडळाच्या भेटीपूर्वी कश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; 15 जण जखमी



























































