
जम्मू कश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 4.15 वाजण्याच्या सुमारास ग्रेनेड हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या या हल्ल्यात 15 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. युरोपिय युनियनचे प्रतिनिधीमंडळ मंगळवारी कश्मीरचा दौरा करणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला आहे.
#JammuAndKashmir: Nine people injured in a grenade attack near bus stand in Sopore today. Two of the injured have been brought to a hospital in Srinagar. pic.twitter.com/uI5OI18z4Q
— ANI (@ANI) October 28, 2019
सोपोरच्या हॉटेल प्लाजाजवळ 4.15 वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला. घटनेनंतर सीआरपीएफचे जवान आणि लष्कराची कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोधमाहिम सुरू आहे. जम्मू कश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही दहशतवाद्यांचे काही गट सक्रीय आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधी शनिवारी श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला करून दहशतवादी पळून गेले होते.म्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवादी सुरक्षा दलाचे जवान आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत.




























































