1 / 8

किशोर कुमार यांनी दोन तीन नाही तर तब्बल चार लग्न केलेली. रुमा गुहा ठाकुर्ता, मधुबाला, योगीता बाली आणि लीना चंदावरकर यांच्यासोबत त्यांनी लग्न केलेली

संजय दत्तची पहिला बायको रिचा शर्मा हिचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर त्याने मॉडेल रिया पिल्लेसोबत संसार थाटला. मात्र 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2008 मध्ये त्याने मान्यतासोबत लग्न केले.

कमल हसन याने पहिलं लग्न त्याने शास्त्रीय गायिका वाणी गणपथीसोबत केले. वाणीसोबत घटस्फोटानंतर त्याने अभिनेत्री सारिकाशी लग्न केले. ते लग्न देखील टिकले नाही. त्यानंतर आता तो गौतमी नावाच्या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन मध्ये राहतोय.

अभिनेता करण सिंह ग्रोव्हर याची लव्ह लाईफ तर कायम चर्चेत राहिली. करणने बिपाशाच्या आधी जेनिफर विंगेट व श्रद्धा निगम या दोन अभिनेत्रींशी लग्न केलेली.

गायक लकी अलीने न्यूझीलंडमधील म़ॉडेल मेघन सोबत पहिलं लग्न केलं. त्यानंतर त्याने इनाया नावाच्या महिलेशी लग्न केले. लकी अलीचं तिसरं लग्न एक ब्रिटीश मॉडेल एलिझाबेथ हलाम हिच्यासोबत झालेले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या