
केंद्र सरकारने अनलॉक- 4 जाहीर करताना शाळा, महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील, असे म्हटले आहे. तर, मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, कोरोनाबाबतची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना असणार आहेत.
Unlock 4:
Metro services can resume from Sept 7;
States & UTs may permit 50% of teaching staff to come to schools for online teaching from 21st Sept.
Schools, colleges & coaching institutions to remain closed.
Swimming pools, theatres, cinema halls to remain closed pic.twitter.com/eeyYnhsoMy
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) August 29, 2020
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहे. अनलॉक-3चा टप्पा 31 ऑगस्टला संपत असल्याने केंद्र सरकारने आज अनलॉक-4च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत अनलॉक-4 असणार आहेत. मात्र, कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे.
हे सुरु होणार
- मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून ग्रेड पद्धतीने सुरु होणार आहे.
- सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा कार्यक्रम 21 सप्टेंबरपासून सुरु होतील. मात्र, केवळ शंभर जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.
- राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर ई-परमिटची गरज लागणार नाही.
- इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीनेच शाळेत जाता येईल.
हे बंद राहणार
- शाळा, महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार.
- चित्रपटगृहे, स्विमिंग पुल, थिएटर्स बंद.
- कन्टेन्मेंट झोनमध्ये बंधने कायम. येथे 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन राहणार.
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच.
- यापुढे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार.





















































