केंद्र सरकारकडून 100 चिनी वेबसाइट्सवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुंतवणुकीच्या नावाखाली हिंदुस्थानींना टार्गेट करणाऱया शंभरहून जास्त चिनी वेबसाइट्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या वेबसाइट्सकडून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र पाठवून या वेबसाइट्सना तत्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. चिनी गुंतवणूक घोटाळा करणाऱया वेबसाइट्सविरुद्ध मोदी सरकारने मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणाऱया चिनी वेबसाईट्सवर कारवाई करावी, अशी मागणी अनेक राज्यांकडून करण्यात आली होती. यासाठी या राज्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. कारवाईपासून वाचण्यासाठी या वेबसाईट्स एका खात्यातून दुसऱया खात्यात पैसे ट्रान्सफर करते. नंतर या काळय़ा धनाला क्रिप्टो करन्सीमध्ये बदलते, असा आरोप आहे.