महागाई भत्ता 3 ते 4 टक्क्यांनी वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून, येत्या 1 जुलैपासून महागाई भत्ता 3-4 टक्क्यांनी वाढणार आहे. केंद्र सरकारकडून वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यांचा आढावा घेतला जातो. यापूर्वी केंद्राने मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला असून, जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू झाली होती.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्के वाढल्यानंतर एकूण डीए 42 टक्के झाला आहे. याआधी सप्टेंबर 2022 मध्ये डीए 4 टक्के वाढवण्यात आला होता. जुलै 2022 पासून हा लागू करण्यात आला होता. 7 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांसाठी डीएमध्ये 3-4 टक्के आणखी वाढीची अपेक्षा असून, जुलैपासून हा लागू केला जाऊ शकतो. सध्या केंद्र सरकारचे 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनर्स आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना डीए तर पेन्शनर्सना डीआर दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आधारावर डीए दिला जातो. तर डीआर हा मूळ पेन्शनच्या आधारे दिला जातो.