आठ महिन्यांत पहिल्यांदाच जीएसटी तिजोरीत 1 लाख कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटात प्रथमच देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) संकलनाने 1 लाख कोटींचा पल्ला पार केला आहे. ऑक्टोबर महिन्यात म्हणजे सुमारे 8 महिन्यांनंतर 1.05 लाख कोटी रुपये इतका जीएसटी वसूल करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

जीएसटी संकलनातील ही वाढ म्हणजे अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळत असल्याचे लक्षण असल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा ऑक्टोबर 31 पर्यंत देशभरात 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपये इतका जीएसटीचा महसूल जमा झाला आहे.तर 31 ऑक्टोबरपर्यंत जीएसटी परताव्याच्या 80 लाख फाईल्स दाखल झाल्या आहेत. हे आर्थिक सुधारणेसाठी आश्वासक पाऊल मानले जात आहे.