सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ? लवकरच घोषणेची शक्यता

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लवकरच 2023 वर्षातला दुसरा महागाई भत्ता जारी करण्याची शक्यता आहे आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यातही केंद्र सरकारने 4 टक्के महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती.

केंद्राकडून वर्षात दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. पहिल्या सहामाहीच्या भत्तावाढीची घोषणा जानेवारीत केली गेली आहे. तर दुसऱ्या सहामाहीच्या भत्तावाढीची घोषणा काही काळात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळीही गेल्या सहामाहीप्रमाणे 4 टक्के वाढ होणं अपेक्षित आहे. सध्या वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

जर ही वाढ झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 46 टक्के इतका भत्ता त्यांना मिळू शकतो. म्हणजेच, मूळ वेतनाच्या दीडपट रक्कम त्यांना मिळेल. उदा. एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 40 हजार रुपये इतकं असेल तर त्याच्या 46 टक्क्यांच्या हिशोबाने त्याला 58, 400 रुपये इतका पगार वाढवून मिळेल.