
केंद्रातील सरकार ऑक्टोबर 2025 मध्ये जीएसटीमध्ये सुधारणा करणार आहे. या सुधारणेमुळे टीव्ही आणि एसी स्वस्त होणार आहे. जीएसटी 2.0 मुळे लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. प्रोसेस केलेले फूड, 1 हजार रुपयांपर्यंत चप्पल-बूट तसेच अन्य काही वस्तूंवर लावलेला टॅक्स 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत केला जाऊ शकतो. यामुळे काही वस्तू या स्वस्त होऊ शकतात. एसी आणि टीव्हीवरील 28 टक्के टॅक्स कमी करून 18 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तू ग्राहकांना स्वस्तात मिळू शकतात.