
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा कधी सुरू करायची, याविषयी केंद्र सरकार पालकांची मते जाणून घेणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यातील शिक्षण सचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावात शाळा सुरू करण्याविषयी पालकांना काय वाटते हे जाणून घेण्याची सूचना केली आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर यांपैकी कोणत्या महिन्यात शाळा सुरू करणे पालकांना सोईचे वाटते, शाळा पुन्हा सुरू झाल्यास पालकांच्या काय अपेक्षा आहेत, याशिवाय पालकांच्या अन्य काही सूचना असतील तर त्या जाणून घेण्यात येणार आहे. पालकांची मते [email protected] आणि [email protected] या ईमेल आयडीवर पाठवायचे आहेत.
15 राज्यांचा निर्णय नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावात शाळा सुरू करायची की नाही, याविषयी देशातील 15 राज्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यात महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे.
राज्यांनी मांडलेली मते
अंदमान निकोबार, छत्तीसगड, डीएनडी-डीएनएच, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, महाराष्ट्र, मेघालय, मिझोरम, पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, सिक्कीम, उत्तरप्रदेश, उत्तराखंड – निर्णय नाही.
आंध्रप्रदेश – साधारणपणे 5 सप्टेंबर
अरूणाचल प्रदेश, केरळ, ओडीसा, लडाख – ऑगस्टनंतर
आसाम – 31 जुलै
बिहार, चंदीगड, हरियाणा – 15 ऑगस्टनंतर
दिल्ली – ऑगस्ट
कर्नाटक, मणीपूर, नागालँड – 1 सप्टेंबरनंतर
पाँडिचेरी – जुलै नंतर
राजस्थान – सप्टेंबर
त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मध्यप्रदेश – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार























































