
हल्लीच्या ताणतणावाच्या जीवन शैलीत प्रवासी आपल्या अनेक अमुल्य वस्तू ट्रेनमध्ये विसरून जात आहेत. अशा वस्तूंमध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, दागिने व रोख रक्कम आदींचा समावेश असून मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने जानेवारी ते जून 2022 दरम्यान 1.89 कोटी रूपये किंमतीच्या प्रवाशांच्या वस्तू त्यांना सहीसलामत मिळवून दिल्या असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने ‘अमानत’ या ऑपरेशन अंतर्गत प्रवाशांना त्यांचे विसरलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इ. यासारख्या मौल्यवान वस्तू त्यांना सुखरूपपणे परत मिळवून दिल्या आहेत. जानेवारी ते जून 2022 दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने सुमारे 1.89 कोटी रूपयांच्या वस्तू परत केल्या आहेत. मुंबई डिव्हीजनमध्ये 689 वाशांपैकी 354 प्रवाशांचे 1.17 कोटी रुपयांचे साहित्य आरपीएफने त्यांना सहीसलामत मिळवून दिले आहे. यात बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
भुसावळ डिव्हीजन – 143 प्रवाशांच्या 28.19 लाखांच्या वस्तू
नागपूर डिव्हीजन – 81 प्रवाशांचे 19.14 लाख रुपयांच्या वस्तू
पुणे डिव्हीजन – 73 प्रवाशांचे 15.04 लाख रूपयांच्या वस्तू
सोलापूर डिव्हीजन – 38 प्रवाशांचे 9.38 लाख किमतीचे सामान.
गेल्यावर्षी 1.65 कोटीच्या वस्तू परत
गेल्या आर्थिक वर्षांत 2021 मध्ये आरपीएफने 666 प्रवाशांचे 1.65 कोटी रुपयांच्या वस्तू परत मिळवून दिल्या आहे. यापैकी 383 प्रवाशांचे 1.01 कोटी रुपयांचे साहित्य मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने परत मिळवून दिले आहे.
























































