मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात तांत्रिक अडचण आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादरच्या फलाट क्रमांक एकवर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 45 मिनिटे उशिराने धावत आहेत. अनेत गाड्या खोळंबल्यामुळे प्रवासी रुळांवर उतरून चालत जात आहेत.