Mumbai Local Train : मुंबईत मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत, एअर क्रॉम्प्रेसरमध्ये बिघाड

सीएसएमटी-टीटवाळा लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत. कल्याणच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एअर क्रॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.