मध्य रेल्वेकडून 75 हजार प्रवाशांवर कारवाई, कोट्यवधींचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात लॉकडाऊन असून फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. असे असताना अनेक जण विनातिकीट किंवा खोटं ओळखपत्र घेऊन प्रवास करत आहेत. रेल्वेने अशा 75 हजार प्रवाशांवर कारवाई करत कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे.

गेल्या दोन महिन्यांत बेकायदेशीररित्या प्रवास करणार्‍यां 75 हजार 793 प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ही माहिती दिली अहे. या प्रवाशांकडून 3 कोटी 97 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 14 एप्रिल पासून सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास बंद करण्यात आला आहे. तेव्हापासून फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

17 एप्रिल ते 21 मे दरम्यान मास्क न लावलेल्या 1 हजार 61 प्रवांशाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 808 प्रवासी खोटे ओळखपत्र दाखवून प्रवास करत होते. अशा प्रवांशाकडून 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे.