
सामना ऑनलाईन । मुंबई
मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला ते दादर दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीस मिनिटांपासून अप आणि डाऊन दोन्ही दिशेच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलही स्थानकातच खोळंबल्या आहेत. या खोळंब्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत असून प्रवासी रेल्वेमार्गावर उतरून पुढे चालत जात आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.


























































