मध्य रेल्वेद्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 12 उपनगरीय विशेष गाड्या!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने 5 डिसेंबर 2023च्या मध्यरात्री (मंगळवार-बुधवार) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे…

मेन लाइन- अप विशेष:- परळ -कल्याण विभाग –

कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून 00.45 वाजता सुटेल आणि परळ येथे 01.05 वाजता पोहोचेल.
कल्याण-परळ विशेष कल्याण येथून 01.00 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.15 वाजता पोहोचेल.
ठाणे-परळ विशेष ठाणे येथून 02.10 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.55 वाजता पोहोचेल.

मेन लाइन – डाऊन विशेष:- कल्याण – परळ विभाग –

परळ-ठाणे विशेष परळ येथून 01.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 1.55 वाजता पोहोचेल.
परळ-कल्याण विशेष परळ येथून 02.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.40 वाजता पोहोचेल.
परळ-कुर्ला विशेष परळ येथून 03.05 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3.20 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन – अप विशेष:- पनवेल – कुर्ला विभाग –

वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून 01.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.10 वाजता पोहोचेल.
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल येथून 01.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.45 वाजता पोहोचेल.
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून 03.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 03.40 वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन – डाऊन विशेष – कुर्ला – पनवेल विभाग-

कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून 02.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे 03.00 वाजता पोहोचेल.
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला येथून 03.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 04.00 वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून 04.00 वाजता सुटेल आणि वाशी येथे 04.35 वाजता पोहोचेल.