कांदा निर्यात बंदीविरोधात नाशिकमध्ये भडका, लिलाव बंद, रास्ता रोको, चक्का जाम

अवकाळीच्या अस्मानी संकटाने त्रस्त शेतकरी पेंद्र शासनाने लादलेल्या कांदा निर्यात बंदीने सुल्तानी संकटात सापडले आहेत. निर्यात बंदीच्या निषेधार्थ शुक्रवारी जिह्यात संतापाचा उद्रेक झाला. ठिकठिकाणी रास्ता रोको करून लिलाव बंद पाडण्यात आले. चांदवडमध्ये पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. कांदा निर्यातीवर पेंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत बंदी लादली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.