
सोशल मिडियावर नियंत्रक नेमण्याचा कोणताही प्रस्ताव नाही अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज संसदेत दिली.
सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2021 बनवला असून त्याचे पालन सोशल मिडियासह सर्व संबंधितांना करावे लागणार आहे. या अधिनियमानुसार ट्विटर आणि व्हाट्सअॅपवर राष्ट्रविरोधी पिंवा राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱया मेसेजेसचे मूळ शोधून काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्यातरी सोशल मिडियावर नियंत्रक नेमण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही असे प्रसाद यांनी सांगितले.
फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल नेटवर्पिंग साईट्सबरोबरच नेटफ्लिक्ससारख्या ओटीटींवर आलेली कोणतीही माहिती 36 तासांत काढून टाकता यावी म्हणून काही नियम घातले जातील तसेच संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा उभारून त्यावर अधिकारी नेमला जाईल अशी घोषणा पेंद्र सरकारने गेल्या फेब्रुवारीमध्ये केली होती.



























































