अजित डोवाल यांच्या सुरक्षेत चूक करणारे तीन कमांडो निलंबीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-doval

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी तीन कमांडोंना बडतर्फ करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी अजित डोवाल यांच्या निवासस्थानी एक व्यक्ती घुसण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलेले. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने तीन कमांडोना दोषी ठरवले असून त्यांना सेवेतून तत्काळ हटविण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून त्याच्या शरीरात एक चिप असल्याचे सांगितले होते. त्या चिपच्या आधारे त्याला नियंत्रित करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र नंतर एआरआय रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारची चिप आढळली नव्हती.