
सामना प्रतिनिधी । मुंबई
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत कोणताही बदल केला नसून ही परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
तीन व पाच वर्षे विधी, बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, बीए-बीएड आणि बीएस्सी – बीएड, बीएड-एमएड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते. गेल्याचवर्षी या परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता. त्यामुळे यंदाही तोच अभ्यासक्रम कायम ठेवावा, अशी मागणी होत होती. या मागणीनुसार राज्य सीईटी सेलने येत्या सीईटीसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सीईटीमधील प्रश्नांची संख्या, एकूण गुण याविषयीची सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.


























































