येरवड्यात महिलेचे 60 हजारांचे गंठण हिसकावत चोरट्यांचा पोबारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील येरवडा परिसरात सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. मुलांसोबत फिरत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 60 हजारांचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार महिला येरवडा येथील मोझे शाळा परिसरात मुलांसोबत फिरत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील पावणे दोन ग्रॅम वजनाचे सुमारे 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.