
जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे यासाठी गडचिरोली जिल्ह्यात नुकताच एक मोठा लोहखनिज प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतू लोहखनिज बाहेर राज्यात व बाहेर जिल्ह्यात पाठवले जाते आहे. इथले लोहखनिज कोनसरी येथील प्रकल्पात साठवून ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी व स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी गडचिरोलीच्या आष्टी येथे काँग्रेसने चक्का जाम आंदोलन केले. जिल्ह्यातील सामान्य गोरगरीब जनतेला खोटे आश्वासन दाखवून सुरजागड प्रकल्प सुरू करण्यात आला त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी व ग्रामीण लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. या चक्का जाम आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.



























































