
उद्योगपती गौतम अदानींवर मोदी सरकार जमिनींची खैरात करत सुटले आहेत. प्रोजेक्टच्या नावाखाली मोठमोठे भूखंड अदानींना दिले जात आहे. या विरोधात तीव्र नाराजी आहे. अशातच आता चंद्राबाबू नायडू यांनीही अदानींवर मेहेरनजर दाखवत त्यांच्या कंपनीला 480 एकर जमीन मंजूर केली आहे. या जमिनीवर अदानी यांची पंपनी आणि रेडेन इन्पह्टेक पंपनी एकत्रितपणे मोठा डेटा सेंटर उभारणार आहेत. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू यांच्या सरकारने 2 डिसेंबर रोजी जमीन हस्तांतरणाचे आदेश काढले. या आदेशानुसार विशाखापट्टणम आणि अनकापल्ली जिह्यांतील 480 एकर जमीन अदानी इन्फ्रा. प्रायव्हेट लिमिटेडच्या हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात रेडेन इन्फोटेकने प्रस्ताव सादर केला होता. आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे.
प्रस्तावानुसार, रेडेन इन्पह्टेक पंपनी पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशात डेटा सेंटर उभारण्यासाठी 87500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या बदल्यात पंपनीला 22 हजार कोटी राज्य सरकारकडून मिळणार आहेत. ही रक्कम डिजिटल उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांतर्गत ‘इन्सेंटिव्ह’ म्हणून दिली जाईल.
रेडेन इन्पह्टेकने जमिनीची मागणी करणारा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार, रेडेन इन्पह्टेक या प्रोजेक्टच्या मुख्य भागात 1जीडब्ल्यूचे एआय डेटा सेंटर बनवेल. यामध्ये अदानी इन्फ्रासह अन्य नोटीफाईड पार्टनर्स असतील. रेडेन इन्पह्टेकने खास विनंती केली होती की, आंध्र प्रदेश इंडस्ट्रीयल इन्फास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेडने जमिनीचे सर्वेक्षण झाल्यानंतर प्रायमरी नोटीफाईड पार्टनर म्हणून अदानी इन्फ्राला जमीन ‘अलॉट’ करावी.


























































