
सामना ऑनलाईन । हैदराबाद
निवडणुकीत मतांची खरेदी सोपी करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नोटाबंदी’ करून दोन हजारांची नोट चलनात आणली असा स्पष्ट आरोप तेलगू देसमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज केला. ते ‘इंडिया टुडे’च्या कॉनक्लेव्ह 2018 मध्ये बोलत होते.
मोदी यांनी दोन हजारांची नोट चलनात आणल्यामुळे निवडणुकीवेळी मोठी रक्कम बंडलाच्या रूपात खिशात बाळगणे सोपे झाले आणि ती एक नोट हातावर टेकवत मताची खरेदी करणे सुलभ झाले असे चंद्राबाबू यांनी सांगितले.

























































