चंद्रपुरात पक्षी निरीक्षण सप्ताहाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थोर पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताह पाळला जातो.

या सप्ताहानिमित्त आज पक्षी निरीक्षण शिबीर घेण्यात आलं. चंद्रपूरजवळच्या जुनोना येथील जंगलात असलेल्या तलावावर देशी-विदेशी पक्षांची मोठी हजेरी असते. दरवर्षी विविध प्रजातींचे पाहुणे इथं भेट देतात. त्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तळ ठोकून असतात.

वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या इको प्रो संस्थेनं आज पक्षीमित्रांसाठी एक शिबीर आयोजित केलं. या माध्यमातून युवकांना विविध पक्षांची माहिती, त्यांनी जीवनपद्धती, अधिवास याबद्दल माहिती देण्यात आली.

चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते हेही या निरीक्षण शिबिरात सहभागी झाले. एक वेगळा अनुभव आणि माहिती यातून मिळाली, अशी प्रतिक्रिया शिबिरार्थीनी दिली.

पाहा व्हिडीओ-