चंद्रपूर जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचे खापर सीईओवर फोडण्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cdcc-bank

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचे खापर विद्यमान संचालक मंडळ सीईओवर फोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा बँकेने आपल्याच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. यासोबतच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घोटाळ्याची दखल घेतली असून प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत.

घोटाळ्याची पहिली सूचना महावितरणने एका पत्राद्वारे जुलै 2020 मध्ये दिली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात वीज देयकांची रक्कम खात्यात नोंद होत नसल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र 2 स्मरणपत्रानंतर देखील बँकेने याकडे  दुर्लक्ष केले. कोरोना लॉकडाउन काळात बँकेने अंतर्गत दक्षता न बाळगल्याने बँकेत हा घोटाळा झाला. सुमारे 30 पतसंस्था आणि वैयक्तिक खातेदारांनी आजवर विशेष कक्षात रक्कम जमा न झाल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. असे असले तरी बँक खातेधारक- ठेवीदारांना विश्वास देण्यासाठी बँक अध्यक्ष संतोष रावत 6 दिवसानंतर पुढे आले.

आरोपी रोखपालाला पाठीशी घालण्याचे आरोप झाल्यावर रोखपाल निखिल घाटे याचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. तक्रारींचा वाढता ओघ बघता हा घोटाळा 5 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.