चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत दीड कोटींचा घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या सुमारे दीड कोटींच्या अफरातफर प्रकरणात आता नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. सहकारी बँकेच्या शहर शाखेतील निखिल घाटे नामक रोखपालाने ग्राहकांच्या पैशांचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर केल्याचीही माहिती समोर येत आहेत.

सध्या ज्या तक्रारीच्या अनुषंगाने हे बिंग फुटले, ते तक्रारदार त्यांच्या 40 लाखांच्या ठेवीची नोंद खात्यात केलीच नसल्याचा गंभीर आरोप करीत आहेत. जनता शासकीय-निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था चंद्रपूर या संस्थेनं मागील डिसेंबरपासून खात्यात भरलेले पैसे जमाच झाले नसल्याचं दिसून आलं. पैसे भरल्याची अर्धी पावती संस्थेकडे आहेत. मात्र प्रत्यक्षात हे पैसे खात्यात भरलेच गेले नाहीत. त्यामुळं या संस्थेनं काल मुख्यालयात लेखी तक्रार केली आणि त्यानंतर हा घोटाळा समोर आला. आता यात पीडित किती आणि लाभार्थी किती, याचा तपशील चौकशीअंती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.