चंद्रपूर- वाघाला ठार मारा; शेतकऱ्यांचे आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात वाघाने उच्छाद मांडला आहे. मुख्यमंत्री, वनमंत्री महोदय सांगा आम्ही मरावं किती, असा संतप्त सवाल तिकडच्या बळीराजाने केला आहे. आरटी-वन वाघाच्या हल्ल्यात आठ शेतकरी-शेतमजूर ठार झाले आहेत, तर पशुधनाचेही मोठे नुकसान वाघाने केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे.

या वाघाला ठार करा, अशी मागणी करीत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी राजुरा तालुक्यात विरूर येथील वन कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. राजुरा तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या आरटी-वन वाघाने आठ जणांचा बळी घेतला. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सूरू आहेत. मात्र तीन महिने उलटून गेल्यावरही वनविभागाला यश आले नाही. वाघाच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले. कापूस तोडणीला आला. धान कापणीला आला आहे. मात्र वाघाच्या भीतीने शेतकामे रखडली आहेत. परिणामी शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे.

शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनात राजुरा तालुक्यातील 28 गावातील शेकडो शेतकरी, शेतमजुरांनी सहभाग घेतला आहे. आंदोलनात शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. वन कार्यालयापुढे जोरदार घोषणाबाजी करीत हे शेतकरी मागण्या प्रशासनापुढे मांडत आहेत.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या