चंद्रपूरमध्ये युवा शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतात कीटकनाशक औषधी पिवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली. अमित मोरे (वय 20 वर्ष ) असे मृतकाचे नाव असून तो जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कविटपेठ या गावातील रहिवाशी आहे. आधीच अमितवर बँकेचे कर्ज होत त्यातही त्याने यावर्षी मोठया मेहनतीने बियाणे घेऊन शेती केली होती. पण नदीला पूर आला व पुराच पाणी शेतात गेल्याने त्याची शेती पुराच्या पाण्याखाली आली. त्यामुळं तो फार चिंतेत होता असं गावातील नागरिक सांगतात. कर्ज कसं फेडायचे या भीतीने अमित याने स्वतःच्या शेतात कीटक नाशक औषधी पिवून जीवन संपवले. घटनेची माहिती तहसीलदार व पोलिसांना कळताच घटनास्थळी पोचले. पुढील कारवाई विरुर पोलीस करीत आहे.

































































