चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात निकृष्ट खाद्यतेलाच्या साठ्यावर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाने मूल येथील सारडा खाद्येतल रिफायनिंग कारखान्यावर धाड टाकून सुमारे २२ लाख ६८ हजार ३६८ रुपये किमतीचा तब्बल १४ हजार २८ क्विंटल खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. पॅकिंगकरिता पुनर्वापर केलेले टिन व कमी दर्जाचे असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जेठमल भंवरलाल सारडा यांच्या रिपॅकिंग युनिटवर छापा टाकून विविध ब्रँडच्या रिफाइंड सोयाबीन तेलाचे पाच नमुने घेत साठा जप्त केला आहे. पुनर्वापर केलेली टिन व निकृष्ट दर्जाचा संशय यावरून ही कारवाई करण्यात आली.