
घुग्घुस -वणी राज्य महामार्ग क्रमांक सातवरील पुनवट गावाजवळ संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. घुग्घूसपासून अवघ्या पाच कि.मी.अंतररावर घडलेल्या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने IVRCL कंपनीचा चार मजुरांना चिरडले. महादेव बालवटकर ( बेलोरा ), राजू मिलमिले ( मारेगाव ) असे मृतकांची नावे आहेत. सुरेश जुनघरी, सतीश गेडाम आणि एक मजूर गंभीर जखमी झालेत. जखमीना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घुग्घुस – वणी मार्गावर आयव्हीआरसीएल ( IVRCL) या कंपनीचे मार्गाचा डागडुजीचे काम सुरू होते. घुग्घुस-वणी राज्य महामार्ग क्रमांक सात वरील पुनवट गावा जवळ कंपनीचे मजूर डागडुजी कार्यात व्यस्त होते. ट्रॅक्टर आणि पिकअपने माल वाहतूक करीत होते. अशात वणी येथून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( MH 31 FC6399 ) पाच मजूरांना चिरडले. यात बेलोरा आणि मारेगाव येथील मजूराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन मजूर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील काही महिन्यात या मार्गावर लहान-मोठ्या अपघाताचा अनेक घटना घडल्या आहेत.

























































