
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. नदी पात्राचा अगदी जवळ सुरू असलेल्या या उत्खननाची प्रशासनाला साधी माहिती सुद्धा नाही. या संदर्भात विचारणा केली असता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी एकमेकांकडे बोटे दाखविली आहेत. राळेगावाकडे जाणाऱ्या मार्गालगत सुरू असलेलं उत्खनन भविष्यात माणसांसाठी आणि पाळीव जनावरांसाठी घातक ठरणारे आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील विविध घाटावरून रेतीच मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू होतं. या उत्खनाला महसूल प्रशासनाचा आशीर्वाद लाभला होता. राजकीय पक्षांनी उपविभागीय अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली होती. चौकशी न झाल्याने ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. महसूल विभाग आणि रेती तस्करांचे गोड संबंध या प्रकरणातून उघड झाले होते. आता थेट नदीपात्राच्या काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन सुरू आहे. विशेष म्हणजे राळेगावाकडे जाणारा मार्ग, स्मशान भूमी आणि देवस्थान या उत्खनन स्थळापासून जवळ आहेत. येथील मुरूम आष्टी- गोंडपिपरी मार्गावर टाकला जात आहे. या बाबत गोंडपिंपरी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी ढवळे यांना विचारणा केली असता, याबाबत मला माहिती नाही तहसीलदारांना विचारा असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर तहसीलदार मडामे यांना विचारांना केली असता त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बोट दाखवीत उडवा उडवीचं उत्तर दिलं. मुरूमासाठी भला मोठा खड्डा खोदला गेला आहे. पावसाळ्यात इथं पाणी साचले तर जीवित हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासन मुरुमाचे उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत.
भर दिवसा नदी पात्राजवळ उत्खनन, अधिकारी म्हणतात आम्हाला माहितीच नाही
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. नदी पात्राचा अगदी जवळ सुरू असलेल्या या उत्खननाची प्रशासनाला साधी माहिती सुद्धा नाही. pic.twitter.com/hQKCLZij0P
— Saamana (@SaamanaOnline) May 14, 2023

























































