चंद्रपूर- घरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायली इथे एका घरात बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याने स्वप्नील मासुरकर या 27 वर्षीय युवकाला जखमी देखील केले.

देवपायली या गावात आज सकाळी एक बिबट्या गावात शिरला आणि त्याने संदीप मडावी यांच्या घरी कोंबडयावर ताव मारला. त्यानंतर लोकांच्या ही बाब लक्षात येताच लोकांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्याने प्रतिहल्ला केला. ज्यामध्ये स्वप्नील मासुरकर हा युवक जखमी झाला. त्यानंतर वनविभागाने जवळपास 5 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवले आणि बिबट्याला जेरबंद केले.

पाहा व्हिडीओ-