
जवळच्या घुग्घुस येथून चार किमी अंतरावर असलेल्या शेणगाव येथील शेतकरी शंकर संभाजी वैद्य (वय 40) हा आज शेतीची कामे आटोपून बैलगाडीनं घरी जात असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार सुरू झाला. वाटेतच शंकरच्या अंगावर वीज कोसळली. त्याचा जागीच मृत्यू झाला. घरचा करता व्यक्ती गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पच्यात त्याला पत्नी, दोन मुलं व चार बहिणी आहे.





























































