चंद्रपूरमध्ये बेल्जियमवरून आलेल्या व्यक्तीला विलगीकरणात ठेवले

1039

चंद्रपूर जिल्ह्यात बेल्जियम येथून आलेल्या नागरिकाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, त्याच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने नागपूर इथं प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

हा नागरिक आजच जिल्ह्यात आला. त्याला ताप असल्याची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने त्यांना तातडीने चंद्रपूरला आणून भरती केलं आणि उपचार सुरू केलेत. अशाप्रकारचे बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती कुणीही लपवू नये. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडे आलेल्या अशा बाहेरच्या लोकांची तातडीने माहिती द्यावी. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे,असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या