
चंद्रपूर मेडिकल कॉलेज मधील निवासी डॉक्टर व सहाय्यक डॉक्टर यांना सेवा पुरविताना असुरक्षित वाटू लागलं आहे. काही दिवसापूर्वी या कॉलेजमधील एका डॉक्टरला मारहाण झाली होती. तर काही डॉक्टरांना जिवघेण्या धमक्या मिळाल्या आहेत. रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांचे नातेवाईक दारू पिऊन झोपतात, त्यामुळे त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे.
डॉक्टरांना मारहाण, शिवीगाळ तसेच रुग्णालय परिसरात महिला डॉक्टरांची छेडछाड होत असल्याचा गंभीर आरोप डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांनी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, आपतकालीन विभागातील सायरन दुरुस्त करणे , बंद पडलेले इंटरकॉम दुरुस्त करणे, रुग्णालयाच्या आवारात वेळवेळी पेट्रोलिंग करणे, डॉक्टरांच्या निवासस्थानी रस्त्यांचे विद्युतीकरण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पास सिस्टीम सुरू करणे, सीसीटीव्ही सिस्टिम पुन्हा सुरू करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.