Chandrapur News – क्रिकेट बुकींविरोधात एलसीबीचे ‘ऑपरेशन क्लिन स्वीप’, 48 तासांत तीन कारवाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्डकपचा फिव्हर जसा चढू लागला आहे, तसा पडद्यामागून सट्टा बाजारही तेजीत आला आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने या सट्टेबाजांविरुद्ध ‘स्पेशल ऑपरेशन’ हाती घेतले असून, गेल्या 48 तासांत तीन ठिकाणी धाडी टाकून सहा जणांवर गुन्हे दाखल करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहे. या कारवाईने क्रिकेट बुकींसह सट्टेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात क्रिकेट शौकीनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

टी-20 वर्ल्ड कपच फिव्हर वाढतानाच क्रिकेट बुकी सक्रीय झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी संपूर्ण जिल्ह्यात 48 तासात तीन कारवाया करुन सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर ‘नाईस 7777’ हा आयडीरून सट्टा घेणाऱ्या सय्यद हारिश ऊर्फ बिट्टू मुकद्दर अली याला अटक केली. तर इरफान कुरेशी, अफजल शेख या दोघांचा शोध घेत आहेत. सर्व कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या.