अपमानजनक उल्लेख केल्याबद्दल रामदेवबाबाचा ओबीसी समाजाकडून जाहीर निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील काही दिवसांपासून मिडिया मध्ये रामदेव बाबा यांची एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्या मध्ये तो स्वतः ला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेताना ओबीसी समाजाचा अवमान करताना दिसत आहे. या वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर रामदेवबाबा यांच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. रामदेव बाबाला अटक करण्याची मागणी ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे.

‘बाबाची दुकानदारी या देशातील 65 टक्के ओबीसी समाजाच्या खरेदी विक्री करून चालत आहे याचे भान या भांडवलदारी बाबाने राखावयास पाहिजे, समाजामध्ये जाणुनबुजून सामाजिक गतिरोध निर्माण करुन ओबीसी समाजाविषयी अपशब्द बोलणे टाळले पाहिजे, अन्यथा यांच्या दुकानासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल असे सुध्दा आज आंदोलन दरम्यान सांगण्यात आले., यांचे भान ठेवून 15 दिवसांच्या आत माफी न मागिलल्यस आंदोलन उग्र करण्यात येईल असा इशारा राजूरकर यांनी दिला.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, गणेश आवारी, डॉ संजय घाटे, कर्मचारी संघटनेचे देवराव दिवसे, प्रदीप पावडे, रजनी मोरे, अजय बलकी, रोशन पचारे, गोविंदा उपरे, विलास भगत, रंगराव पवार, पवन अगदारी, नागेश बोडे, अतुल मोहितकर, नंदू टोंगे, सुरेश विधाते, रणजित पिंपलशेडे, तुळशीराम देरकर, संतोष बांदूरकर, दिनेश भोंगडे, भास्कर सोनेकर लखन हिकरे इ. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.