चंद्रपूर – नगर प्रशासन आणि वेकोली अधिकाऱ्यांना जागवण्यासाठी युवक काँगेसचा भर पावसात बैठा सत्याग्रह

पालिका प्रशासन आणि वेकोलीच्या सीमा वादात संपलेला कॉलरी परिसरातील सरदार पटेल वार्ड विकोलिन अनेक वर्षांपासून विकास कामांच्या प्रतीक्षेत आहे. अशातच नगरसेवकांचे दुर्लक्ष आणि पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे खड्डे धोखादायक ठरत आहेत.

या रस्त्याचे दुरुस्ती काम व्हावे म्हणून येथील युवक काँग्रेसने अनेक आंदोलने केली आहेत. मात्र अद्यापही त्यांची दाखल घेण्यात आलेली नाही आहे. आजही युवक काँग्रेसने भर पावसात रस्त्यावरील खड्यातील पाण्यात बैठा सत्याग्रह करून वेकोली आणि नगर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

जो पर्यंत रोडच्या दुरुस्तीला सुरुवात होत नाही. वार्डातील विकासकामे होत नाही. तोपर्यंत लक्षवेधी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या